या आठवणींच्या भरवश्यावरच अवघं आयुष्य काढून टाकण्याच्या बाता जेव्हा मारल्या, तेव्हा ते सगळं खुप काव्यमय, एकदम आदर्श ईमोशनल वगैरे वाटलं होतं. सोबत घालवलेले हे सुंदर क्षणच आयुष्यभर पुरतील वगैरे बोलतांना खरंच अशी वेळ आल्यावर किती अवघड जाईल (अवघड म्हणजे खुपच साधारण शब्द आहे ईथे. जीवघेणं वगैरे म्हणायला पाहिजे) याची कल्पना नव्हती. आता या आठवणी सगळ्या बोहा-या वाटू लागल्या आहेत. आपल्याला विस्मरणाची देणगी लाभली आहे असं म्हणतात. रट्टू मारून जसं पाठ करतो, तसं काहीतरी करून विसरून जाण्याचं तंत्र असायला हवं होतं.
आठवणींचीच सगळी कटकट आहे. गुळगुळीत आणि मोकळ्या रस्त्यावर बिन्दास्त गाणं म्हणत गाडीवर जात असतांना अचानक समोर मांजर आडवं जावं अशी भक्कन आठवण येते. कुठेही. अगदी काही ध्यानिमनी नसतांना. मग आपण रस्त्यावरून चालणं तर सुरू ठेवतो, पण मांजर आडवं गेल्याचं काही बराच वेळ डोक्यातून जात नाही ना; अगदी तसंच आपलं सगळं काम सुरू राहतं, पण आठवण काही डोक्यातून जात नाही. मांजर आडवं गेल्याने काहीच होत नाही, हे माहिती असुनही मनात एक हूरहूर कायम राहतेच, त्याचप्रमाणे आठवण काढून काहीच फरक पडणार नाही, हे माहित असुनही आठवणीची कूरकूर कायम राहतेच. आणि मग एकातून दूसरी, दूस-यातून तीसरी. आठवणीची लिंकही अपार लागते. विनाकारण आठवणी तयार करून ठेवल्या असं वाटतं. आणि यांच्या भरवश्यावर म्हणे पुढचं अवघं आयुष्य़ घालवणार होतो! किती मोठी बेवकुफी!
ही कटकट नसतीच तर किती बरं झालं असतं? माणूस ब्लॅंक! अगदी बिन्धास्त! मग काय केलं असतं? मग एकटं बसुन राहता आलं असतं का तासनतास? गज़ल ऐकताना डोळ्यात पाणी आलं असतं का? कवीता वाचतांना ती 'क्या बात है' म्हणुन थेट मनाला भिडली असती का? कॅनव्हासवरचा गडद होत जाणारा रंग आणि पुसट होत जाणा-या प्रतीमा -- चित्रकाराने समजावून न सांगताही त्याचा अर्थ लावता असता का? नाटकातला, किंवा सिनेमातला सगळ्यात महत्त्वाचा 'बेस्ट झालेला' तो सीन -- ज्यात कुणीच एकमेकांशी काहीच बोलत नाही, पण न बोलताच सगळं सांगुन जातात -- तो पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या असत्या का? भैरवीचा टिपेचा स्वर लावतांना नकळत समाधिस्त होणा-या गायकाबरोबर मलाही त्या अवस्थेचा अनुभव आपोआप आला असता का?
आठवण कटकट असेलही कदाचित. पण त्यामुळे शरिरात फक्त मेंदूच नाही तर हृदयही असतं, याची जाणीव होत राहते. आठवण अशीच येत राहिली तर मेंदूबरोबर हृदयही सुरू राहिल. आठवण जगवेल, आयुष्य आहे तोवर.
या आठवणींच्या भरवश्यावरच अवघं आयुष्य काढून टाकण्याच्या बाता जेव्हा मारल्या. अगदीच खोटं नव्हतं ना ते?

No comments:
Post a Comment